नेत्रश्लेष्मलाशोथ (म्हणजे कंजक्टिव्हायटीस किंवा गुलाबी डोळा किंवा "डोळे येणे" असेही म्हणतात) हा डोळ्याच्या पांढऱ्या भागाच्या बाहेरील थराचा (कंजक्टिव्हा) आणि पापणीच्या आतील पृष्ठभागाच्या दाहाचा रोग आहे. ह्यामुळे डोळा गुलाबी किंवा लालसर दिसू लागतो व वेदना, जळजळ किंवा खाज येऊ शकते. प्रभावित डोळ्यातून अश्रू वाढतात किंवा झोपे नंतर सकाळी पापण्या चिकटलेल्या असेतात. ह्यामुळे डोळ्याच्या पांढऱ्या भागावर सूज देखील येऊ शकते. हा एक किंवा दोन्ही डोळ्यांवर परिणाम करू शकतो.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →नेत्रश्लेष्मलाशोथ
तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!