नेतोजी पालकर हे दीर्घ काळ छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याचे सरनौबत होते. त्यांना प्रतिशिवाजी म्हणजेच "दुसरा शिवाजी" असेही म्हणले जायचे. नेतोजी हे मूळचे पुणे जिल्ह्यातील शिरूरचे, परंतु त्यांचे वडील रायगड जिल्ह्यातील खालापूर येथे स्थायिक झाले होते.
नेताजींचा जन्म खालापूर येथील चौक या गावी झाला.
नेतोजी पालकर यांची समाधी तामसा (तालुका:-हदगाव, नांदेड जिल्हा) येथे आहे.
अफजलखानाच्या वधाच्या वेळी अफजलखानाच्या सैन्याला हुसकावून लावण्यात नेतोजींनी सिंहाचा वाटा उचलला होता. मात्र पुरंदरच्या तहानंतर श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांनी वादविवादाचा बनाव करून त्यांना मोगलाकडे पाठविले, त्यांनी आदीलशहावर आक्रमण केले. मुघलांनी त्यांचे धर्मांतर केले. नेतोजींना अरबस्तानात पाठविले. तसेच त्यांना नजरकैदेत ठेवले. यामुळे ते स्वराज्यापासून दूर होते. त्यांनी मुघलांची चाकरी केली, पण ९ वर्षांनी नेतोजी पुन्हा स्वराज्यात आले.
स्वराज्यात पुन्हा आल्यावर श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांनी पुन्हा योग्य विधी पार पाडून त्यांना परत हिंदू धर्मात प्रवेश दिला, व त्यांच्या मुलाचा जानोजीचा स्वतःच्या मुलीशी विवाह करून दिला. श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांनंतर त्यांनी श्रीमंत छत्रपती संभाजी महाराजांचीही चाकरी केली होती.
पुरंदर तहनंतर श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज, मिर्झा राजे, सरसेनापती नेतोजी पालकर आणि दिलेरखान विजापूरवर चालून गेले. तेथे आदिलशाही सेनापती सर्जाखान यांच्यासमोर ते चौघे अपयशी ठरत होते. आणि त्या अपयशाचे खापर दिलेरखान महाराजांवरच फोडू लागला. म्हणून विजापूरकरांचा पन्हाळगड जिंकण्यासाठी महाराज विजापुरहून परत आले, महाराजांनी रात्रीच गडावर छापा घातला. आदिलशाही किल्लेदार बेसावध असेल अशी महाराजांची खात्री होती, पण किल्लेदार सावध होता. त्यात सरसेनापती नेतोजी पालकर वेळेवर पोहोचून महाराजांना कुमक पोहोचवू शकले नाहीत. यात महाराजांचा पराभव झाला आणि सुमारे १,००० माणसे मारली गेली.
महाराज नेतोजींवर चिडले आणि त्यांनी नेतोजीला पत्राद्वारे समयास कैसा पावला नाहीस असे म्हणून बडतर्फ केले.
मग, नेतोजी विजापूरकरांना जाऊन मिळाले.
महाराज आग्ऱ्याच्या भेटीस निघून गेल्यानंतर मिर्झाराजांनी नेतोजी पालकरांना विजापूरकरांकडून मुघलांकडे वळवले.
नेताजी पालकर
एका नवीन दृष्टिकोनातून पहा.