नॅशनल पीपल्स पार्टी

चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.

नॅशनल पीपल्स पार्टी (National People's Party) हा भारतातील राष्ट्रीय स्तरावरील राजकीय पक्ष आहे, तरी त्याचा प्रभाव मुख्यत: मेघालय राज्यात केंद्रित आहे. पी.ए. संगमा यांनी जुलै २०१२मध्ये राष्ट्रपती निवडणूक लढवल्यामुळे, पक्ष शिस्तीचे गैरवर्तनामुळे NCP तून काढून टाकल्यानंतर ६ जानेवारी २०१३ रोजी या पक्षाची स्थापना केली होती. ७ जून २०१९ रोजी त्याला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा देण्यात आला. ईशान्य भारतातील हा पहिला राजकीय पक्ष आहे, ज्याने हा मान मिळविला आहे. पक्षाचे निवडणूक चिन्ह पुस्तक आहे. त्यासाठीचे महत्त्व म्हणजे केवळ साक्षरता आणि शिक्षण हेच दुर्बल घटकांना सक्षम बनवू शकतात, असा पक्षाचा विश्वास आहे.

पी.ए. संगमा ह्यांच्या २०१६ मधील मृत्यूनंतर नॅशनल पीपल्स पार्टीची धुरा त्यांचे पुत्र कॉनराड संगमा ह्यांच्यावर आली. २०१८ मेघालय विधानसभा निवडणूकीमध्ये संगमा ह्यांच्या नेतृत्वाखाली एन.पी.पी. ने ६० पैकी २० जागांवर विजय मिळवला व भारतीय जनता पक्ष तसेच राष्ट्रीय लोकशाही आघाडीमधील इतर प्रादेशिक पक्षांच्या पाठिंब्याच्या बळावर सरकार स्थापन केले. २०१९ लोकसभा निवडणुकांमध्ये तुरा लोकसभा मतदारसंघामधून NPPची अगाथा संगमा लोकसभेवर निवडून आली. आजच्या घडीला हा पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा घटक पक्ष आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →