झोरम पीपल्स मूव्हमेंट (संक्षिप्त: ZPM) ही मिझोरम राज्यातील सहा प्रादेशिक पक्षांची युती आहे जी आमदार आणि माजी पोलीस अधिकारी लालदुहोमा यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झाली आहे. पक्षाचा धर्मनिरपेक्षता आणि भारतातील धार्मिक अल्पसंख्याकांच्या संरक्षणावर विश्वास आहे.
२०१८ च्या मिझोरम विधानसभा निवडणुकीत झोरम पीपल्स मूव्हमेंट उदयास आली होती आणि ८ जागा जिंकल्या. ह्या युतीतील सहा पक्ष आहे: मिझोरम पीपल्स कॉन्फरन्स, झोरम नॅशनलिस्ट पार्टी, झोरम एक्सोडस मूव्हमेंट, झोरम डिसेंट्रलाईझेशन फ्रंट, झोरम रिफॉर्मेशन फ्रंट आणि मिझोरम पीपल्स पार्टी. मिझोरम पीपल्स कॉन्फरन्स हा ह्या युतीचा सर्वात मोठा संस्थापक आणि पक्ष होता ज्याने २०१९ मध्ये युती सोडली.
२०२३ मध्ये, पक्षाने नव्याने स्थापन झालेल्या लुंगलेई नगरपरिषदेतील सर्व ११ प्रभाग जिंकले. २०२३ मधील विधानसभा निवडणू[कीत युतीने सर्व ४० जागा लढल्या व त्यातील २७ जागा जिंकून विजय मिळवला. ८ डिसेंबर २०२३ ला लालदुहोमांनी राज्याचे मुख्यमंत्री पद सांभाळले.
झोरम पीपल्स मूव्हमेंट
जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.