नीरा शिवतक्रार (पुरंदर)

एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.

निरा हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील एक शहर आहे. नीरा नदीच्या तीरावरती साधारणता दोनशे वर्षांपूर्वी हे छोटेसे गाव वसल होत. सन 1856 साली ब्रिटिशांनी ब्रिटिश साउथ सेंट्रल रेल्वे तर्फे नीरा नदीवर रेल्वे वाहतुकीसाठी पूल उभारला.

1856 साली निरा येथे रेल्वे स्टेशन पुणे हुबळी या लोहमार्गावर हे महत्त्वाचे स्टेशन ब्रिटिश काळामध्ये निर्माण केले गेले. मुबलक पाणी असल्यामुळे निरा या ठिकाणी रेल्वेच्या गाड्यांमध्ये पाणी भरण्याचे काम सुरू झाले

सन 1968 मध्ये एक तेल कंपनी नीरा नदीकिनारी पॉलिकेम या नावाने सुरू झाली. कंपनी मुळे या भागामध्ये वसाहत निर्माण होऊ लागली

महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लोक रोजगाराच्या साठी निरामध्ये वास्तव्य करू लागले

शेतकऱ्यांना हक्काची शेतमाला ला बाजारपेठ उपलब्ध व्हावी म्हणून निरा कृषी उत्पन्न बाजार समितीची स्थापना पुरंदर आणि बारामती तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी करण्यात आली.

ह्या बाजार समितीमध्ये प्रामुख्याने गुळ, कांदा कापूस इत्यादी वस्तूंची देवाण-घेवाण सुरू झाली

1968 मध्ये टाटा पॉवर्स लिमिटेड यांच्यामुळे निरा व निरा पंचक्रोशीतील गावांना वीज पुरवठा करण्यासाठी वीज उपकेंद्र सुरू झाल. निरा व पंचक्रोशीतील गावातील मुलांना शिकण्यासाठी रयत शिक्षण संस्थेचे माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालय सुरू करण्यात आल.

तसेच पुणे जिल्हा परिषदेत मार्फत जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षना साठी शाळा क्रमांक एक व दोन यांची सुरुवात झाली

निरेमध्ये मध्ये पहिली मुलींची कन्या शाळा लीलावती रिकव्हलाल शहा यांच्या नावाने सुरू करण्यात आली.

हळूहळू मोठी बाजारपेठ निरा गावामध्ये उदयास येऊ लागली

ब्रिटिश बॉम्बे स्टेटच्या अंतर्गत लोकल बॉडी म्हणून 1935 झाली निरा येथे गाव पंचायत सुरू झाली.

1 मे 1960 मध्ये महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेनंतर 1961 मध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांतर्गत महानगरपालिका नगरपालिका तालुका पंचायत ग्रामपंचायत जिल्हा परिषद याची निर्मिती करण्यात आली.

व गावपंचायतला स्थानिक स्वराज संस्था ग्रामपंचायत हा दर्जा भारत सरकार आणि महाराष्ट्र शासन यांच्यामार्फत देण्यात आला.

पुरंदर बारामती फलटण खंडाळा या तालुक्यांच्या तसेच पुणे आणि सातारा जिल्हा यांच्या सीमेवर

नीरा नदीच्या नावाने निरा हे गाव वसले

आज या गावाची लोकसंख्या 25 हजाराच्या वर पोहोचली आहे

मुबलक पाणी असल्यामुळे तसेच रेल्वे बस सेवा यासारख्या सुविधा उपलब्ध असल्यामुळे

पुणे शहरात कामाला जाणारे चाकरमाने नोकरदार विद्यार्थी निरा या ठिकाणी वास्तव्यास पसंती देतात.

पुरंदर तालुक्यातील 3 शहरांमधील निरा हे एक महत्त्वाचे शहर आहे

सासवड जेजुरी बारामती फलटण खंडाळा

यासारखी तालुक्याचे ठिकाणे नीरेपासून 30 ते 40 किलोमीटरच्या अंतरावर आहे

पुणे शहर नीरा शहरापासून 70 किलोमीटरच्या अंतरावर आहे

संपूर्ण देशात नीरा हे गुळ व कांदा यासाठी प्रसिद्ध आहे.

श्री संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांचा पालखी सोहळा निरा या ठिकाणी दुपारचा विसावा घेऊन इंदिरा नदी पात्रात श्रीक्षेत्र दत्त घाट पाडेगाव - निरा या ठिकाणी माऊलींच्या पादुकांना शाहिस्नान घालण्यात येते.

पुढे पालखी सोहळा सातारा जिल्ह्यामध्ये प्रवेश करतो.

ऐतिहासिक शाही स्नान सोहळा म्हणून दोन्ही जिल्ह्याचे सर्व सरकारी अधिकारी जिल्हाधिकारी सर्व विभागाचे कर्मचारी पोलीस प्रशासन या ठिकाणी उपस्थित असते.

भोर तालुक्यातून उगम पावलेली निरा नदी पुढे निरा नरसिंहपुर या ठिकाणी तिच्या मुख्य नदी असलेल्या भीमा नदी शी जाऊन मिळते. पुरंदर खंडाळा फलटण माळशिरस बारामती इंदापूर या तालुक्यातील शेतकरी नीरा नदीच्या लाभ क्षेत्रावर शेती मोठ्या प्रमाणात करतात

वीर धरणा मधून निरा उजवा कालवा आणि डावा कालवा यांच्यामुळे शेतीला मुबलक पाणी उपलब्ध होत असते

ह्या पाण्यावर प्रामुख्याने ऊस शेती ही केली जाते तसेच आंतरपीक म्हणून भाजीपाला फळभाज्या इत्यादी ची शेती शेतकरी करत असतात.

संत तुकाराम महाराजांनी आपल्या अभंगातून निरा नदीचे गुणगान केले आहे.

नीरा नदीला नीरा माई असेही स्थानिक लोक संबोधतात.

पावसाळ्यामध्ये निरा - देवधर,भाटघर, वीर गुंजवणी, धरणातून नीरा नदीमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी सोडले जाते.

हे पाणी पुढे महाराष्ट्रातून वाहून जाऊन कर्नाटक राज्यातून वाहत बंगालच्या उपसागराला मिळते.

निरानदी ही या भागातील लोकांची जीवनदायी म्हणून ओळखले जाते.निरा नदीचा पाण्यावर हजारो गावे व लाखो एकर शेती लागवडी खाली येते. ऊस, कांदा, मिरची, बाजरी, ज्वारी, मका, हरभरा, लसूण, ही प्रमुख्याने पिके शेतकरी घेतो.

निरा शहर पुरंदर व बारामती तालुक्यातील हद्दीत वसलेले आहे. निरा ला तालुका जरी पुरंदर असला तरी इतर सर्व शासकीय कार्यालय तहसीलदार भूमिअभिलेख, प्रांत ऑफिस ही पुरंदर मध्ये तर पोस्ट ऑफिस, mseb, पाटबंधारे ऑफिस, town प्लॅनिंग ऑफिस,,pwd ऑफिस पोलीस या सारखी सर्व कार्यालय बारामती तालुक्याचा चा अख्यारीत येतात.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →