नीती आयोग (नॅशनल इंस्टीटयूशन फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया) ही भारत सरकारची विकास धोरण ठरवणारी शिखर संस्था आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून नीती आयोगाची स्थापना करण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी नीती आयोगाचे अध्यक्ष आहेत. माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी स्थापन केलेला योजना आयोग बरखास्त करून त्या जागी नीती आयोग नेमण्यात आला. डॉ. राजीव कुमार हे सध्या नीती आयोगाचे उपाध्यक्ष होते. ०१ जानेवारी २०१५ रोजी भारत सरकारने नीती आयोगाची घोषणा केली. ८ फेब्रुवारी २०१५ रोजी नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली नीती आयोगाची पहिली बैठक झाली.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →नीती आयोग
याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.