नाविका सागर परिक्रमा

याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.

नाविका सागर परिक्रमा

नाविका सागर परिक्रमा ही एक भारतीय नौदलाच्या सहा महिला अधिकाऱ्यांनी केलेली जगाची प्रदक्षिणा आहे. या सहा महिला सदस्यांच्या पथकाने आयएनएसव्ही तारिणीवरून त्यांच्या पहिल्या जागतिक प्रवासात संपूर्ण परिक्रमेचे स्वतःच व्यवस्थापन केले. हा प्रवास १० सप्टेंबर २०१७ ते २१ मे २०१८ पर्यंत असा एकूण २५४ दिवस चालला. हा प्रवास फक्त फ्रीमँटल, लिट्टेल्टन, पोर्ट स्टॅन्ली आणि केप टाउन या ४ बंदरांसह पोर्ट लुइस येथे सक्तीने तांत्रिक थांबा देऊन पूर्ण केला गेला. तसेच ही परिक्रमा विषुववृत्त दोनदा ओलांडून आणि ३ महासागरांमधून फिरून पूर्ण पार पडली. हा प्रवास मूळतः ५ सप्टेंबर २०१७ रोजी सुरू होणार होता, परंतु नुकत्याच संरक्षण मंत्री म्हणून नियुक्त झालेल्या निर्मला सीतारमण यांच्याहहस्ते या पथकाला हिरवा झेंडा दाखवता यावा म्हणून ५ दिवसांचा विलंब झाला. २१,६०० नॉटिकल मैल (४०,००० किमी) प्रवास केल्यानंतर ही बोट गोव्यातील आयएनएस मांडवीत परतली. हा प्रवास नॅशनल जिओग्राफिक आणि भारतीय नौदलाने संयुक्तपणे निर्मित केलेल्या तारिणी या माहितीपटात दाखवण्यात आला होता. याचे प्रथम प्रसारण ८ मार्च रोजी जागतिक महिला दिनानिमित्त लेडी श्री राम कॉलेजमध्ये झालेल्या कार्यक्रमात केल्या गेले. या प्रवासापासून प्रेरणा घेत नॅशनल जिओग्राफिक ने "गर्ल्स हू सेल" नावाची नवीन केवळ महिलांची माहिती असलेली मालिका सुरू केली.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →