नारेव नदी ही बेलारुस आणि पोलंडमधून वाहणारी एक नदी आहे. ही व्हिस्चुला नदीची उपनदी आहे.
पश्चिम बेलारुसमधील झिकी बाग्नोजवळ उगम पावून ही नदी पश्चिमेस वाहते व पोलंडमध्ये बग नदीस मिळून पुढे व्हिस्चुला नदीला मिळते.
२३ ऑगस्ट, १९३९ रोजी दुसऱ्या महायुद्धाच्या आधी झालेल्या मोलोटोव्ह-रिबेनट्रोप करारानुसार पोलंडचे विभाजन नारेव तसेच बग, व्हिस्चुला आणि सान नद्यांना सीमारेषा धरून केले गेले होते. २८ सप्टेंबरपर्यंत सोवियेत सैन्याने पोलंडमध्ये घुसून नारेव नदीच्या तीरापर्यंत आपले वर्चस्व बसविले होते.
नारेव नदी
थोडक्यात पण महत्त्वाचे.