नारिंगी हे मुंबईजवळच्या विरार भागातील एक खेडेगाव आहे. या गावात आगरी व कोळी समाजाचे लोक राहतात.
महाराष्ट्रातील सामान्य सणांसारखे सर्व सण येथे सर्व लोक एकत्र येऊन साजरे करतात साजरे केले जातात. शिमगा (होळी) ह्या सणात ह्या समाजात पंधरा दिवस आधी चालू होतो. हा सण कोळीवाड्यात फार आवडीने साजरी होतो. होळीमध्ये पंधरा दिवस आधी त्यांच्याकडे लहान भेंडीचे झाड (पारस भेंडी) किंवा खारफुटी (त्यांच्या भाषेत टिवरीचे झाड) लावून दर दिवशी होळ्या जाळल्या जातात. ह्या पंधरा दिवसाच्या होळ्यांना " भेंडले " म्हणतात.मग शेवटच्या दिवशी मोठी होळी म्हणून सुपारीच्या झाडाला देवीसारखे सजवून जाळतात.
हे लोक समुद्रावर पोटासाठी अवलंबून असल्याकारणाने समुद्रालाही देव मानतात आणि नारळी पौर्णिमेच्या दिवशी समुद्राला वाजतगाजत सोन्याचा मुलामा दिलेला नारळ अर्पण करतात. यांच्या मते, हा नारळ अर्पण करून समुद्र शांत होतो, त्याचबरोबर समुद्र आपल्याला त्याच्यातील साधन संपत्ती देतो. या दिवशी घरोघरी नारळीभात, नारळवडी, करंज्या. यांसारखे नारळाचे गोड नैवेद्य करतात
नारिंगी (वसई)
थोडक्यात पण महत्त्वाचे.