नारायण आठवले (जन्म : १६ ऑगस्ट १९३२; - २८ एप्रिल २०११) हे मराठी भाषेतील पत्रकार, साहित्यिक, स्वातंत्र्यसैनिक आणि भारतातील शिवसेना या राजकीय पक्षाचे माजी खासदार होते. ते त्या पक्षाच्या तिकिटावर इ.स. १९९६च्या लोकसभा निवडणुकांमध्ये, महाराष्ट्र राज्यातील उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले होते. त्यांची खासदारकीची कारकीर्द जेमतेम अठरा महिन्यांची होती.
त्यांनी संयुक्त महाराष्ट्रासाठीचा लढा, गोवा मुक्ति चळवळ आदी आंदोलनांत सक्रिय भाग घेतला होता. ४०हून अधिक वर्षे त्यांनी राजकारणावर आणि सामाजिक विषयांवर लेखन केले. लोकाभिमुख पत्रकार म्हणून त्यांनी महाराष्ट्रात व गोव्यात गोमंतक, जनवाणी, लोकमित्र, लोकसत्ता, नवशक्ती ह्या वर्तमानपत्रांत, आणि प्रभंजन, चित्रलेखा आदी साप्ताहिकांमधून लिखाण केले. त्यांची लोकसत्तेतील भारूड आणि फटकळ गाथा ही सदरे गाजली होती. सोबत या साप्ताहिकात त्यांचे लिखाण ’बॉम्बे कॉलिंग’ या, आणि चित्रलेखामध्ये ’महाराष्ट्र माझा’ आणि ’सख्या हरी’ या शीर्षकांखाली होत असे.
नारायण आठवले यांनी गोव्यात ‘लोकविश्वास प्रतिष्ठान‘ या नावाच्या मूकबधिर मुलांसाठीच्या संस्थेच्या स्थापनेसाठी मोलाचे काम केले. ही संस्था मूकबधिर मुलांसाठी निवासी शाळा चालवते.
‘गोमंतक मराठी अकादमी‘च्या उभारणीतही त्यांचे योगदान होते.
नारायण आठवले
यामागील विज्ञान आणि इतिहास.