नाधवडे हे महाराष्ट्राच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी तालुक्यातील एक निसर्गसमृद्ध गाव आहे. कोल्हापूर–तळेरे राष्ट्रीय महामार्ग (NH 166G) या गावातून जातो. वैभववाडीपासून अंदाजे ७ किमी अंतरावर हे गाव वसलेले आहे. सह्याद्रीतील करूळ घाट उतरल्यानंतर पठारी आणि मनोहारी असा परिसर नाधवडे गावात दिसतो.
नाधवडे हे ‘उमाळ्यांचे गाव’ म्हणून प्रसिद्ध असून गोठणा नदीचा उगम येथील नैसर्गिक झऱ्यांमधून होतो. मुंबई–गोवा महामार्गापासून (तळेरे) सुमारे ५ किलोमीटर अंतरावर हे गाव आहे.
नाधवडे (वैभववाडी)
जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.