शिडवणे, कणकवली
शिडवणे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यात असलेले एक गाव आहे. हे गाव दक्षिण कोकण प्रदेशात येते.
इतिहास आणि नामकरण
शिडवणे या गावाचे पूर्वीचे नाव सिद्धवन असे होते. कालांतराने अपभ्रंश होऊन ते शिडवणे असे झाले.
भौगोलिक स्थान आणि हवामान
शिडवणे हे गाव कणकवली तालुक्याच्या मध्य-दक्षिण भागात वसलेले आहे.
भौगोलिक क्षेत्र: गावाचे एकूण भौगोलिक क्षेत्र 1021.27 हेक्टर आहे.
तालुका मुख्यालय: कणकवलीपासून हे गाव अंदाजे 32 किलोमीटर अंतरावर आहे.
पिनकोड: गावाचा पिनकोड 416801 आहे.
हवामान: येथील हवामान समशीतोष्ण स्वरूपाचे आहे.
* पावसाळ्यात येथे भरपूर पाऊस पडतो.
* हिवाळ्यात हवामान थंड असते आणि अनेकदा सकाळी धुके पडते.
* उन्हाळ्यात हवामान उष्ण असते.
लोकजीवन आणि समाज
शिडवणे गावात विविध समाज गुण्यागोविंदाने नांदतात.
प्रमुख समाज: प्रामुख्याने कुणबी, वाणी, भंडारी, सुतार, चर्मकार, बौद्ध, मराठा, जैन आणि मुस्लिम समाजाचा गावात समावेश आहे.
पारंपरिक व्यवसाय: गावातील मुख्य व्यवसाय शेती हा आहे. भातशेती पावसाळ्यात प्रमुख पीक म्हणून घेतली जाते. शेतीसोबतच मोलमजुरी, चिरे काढणे आणि पूर्वी बैलगाडीने वाहतूक करणे हे पूरक व्यवसाय चालत असत. बौद्धवाडीतील लोक बांबूपासून सुपे, रवळी आणि टोपल्या बनवण्याचे पारंपरिक बुरुड काम करतात.
गावात अनेक वाड्या (वस्त्या) आहेत, त्यापैकी प्रमुख खालीलप्रमाणे:
गावठणवाडी
बौद्धवाडी
भोवडवाडी
टक्केवाडी
पाष्टेवाडी
कोनेवाडी
सुतारवाडी
अर्थव्यवस्था आणि पीक-उत्पादन
येथील अर्थव्यवस्था मुख्यतः शेतीवर आधारित आहे.
प्रमुख पिके: भात (प्रमुख पीक), नाचनी (नाचती), वरई (श्री), तीळ, कुळीथ, उडीद, बरग आणि हरीक यांसारखी पिके घेतली जातात.गावात अनेक काजू बागा , आवळा बागा , आंबा बागा आणि फार्म हाऊसेस आहेत . यावर आधारित ' काजू फॅक्टरी ' आहेत .
धार्मिक आणि ऐतिहासिक स्थळे
शिडवणे हे धार्मिक आणि सांस्कृतिक विविधतेचे केंद्र आहे.
शिडवणे गावाविषयी माहिती
शिडवणे हे गाव महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यात वसलेले एक निसर्गरम्य ठिकाण आहे. हे गाव आपल्या हिरव्यागार सौंदर्यासाठी आणि श्रद्धास्थानांसाठी ओळखले जाते.
भौगोलिक स्थान आणि दळणवळण
हे गाव मुंबई-गोवा महामार्गावरील तळेरे या ठिकाणापासून फक्त ४ ते ५ किलोमीटर अंतरावर आहे.
गावामध्ये कणकवली, तळेरे व वैभववाडी येथून एस.टी. (बस) सेवा उपलब्ध आहे.
गावात नदी नसून, अनेक नैसर्गिक 'वहाळ' (ओढे/प्रवाह) आहेत, ज्यामुळे गावात वर्षभर पाणी टिकून राहते.
गावातील 'बांबार' हे एक खास ठिकाण आहे. तिथे तीन वहाळ एकत्र येतात आणि तिथे गणपती विसर्जनाची मोठी कोंड (पाण्याचा साठा) आहे. याच ठिकाणाहून गावच्या पाणीपुरवठ्यासाठी विहिरींद्वारे पाणी घेतले जाते.
धार्मिक स्थळे आणि उत्सव
शिडवणे हे खऱ्या अर्थाने मंदिरांचे गाव आहे. गावात एकूण चार प्रमुख मंदिरे आहेत:
श्रीदेव गांगेश्वर मंदिर : हे गावाचे मुख्य ग्रामदैवत आहे.
श्रीदेव रवळनाथ मंदिर: हे गावच्या मुख्य रस्त्यालगत असून, याचा जिर्णोद्धार झालेला आहे.
श्रीदेव ब्राह्मणदेव मंदिर :हे कोनेवाडीजवळ, तळेरेकडून येणाऱ्या रस्त्यावर आहे.
श्रीदेवी विठ्ठला देवी मंदिर: हे रवळनाथ मंदिराच्या बाजूला आहे.
श्रीदेवी निगडा देवी मंदिर: हे गांगेश्वर मंदिराच्या समोर माळावरती असलेले एक पुरातन कौलारू मंदिर आहे.
मुख्य उत्सव:
श्रावण महिन्यातील सोमवारचे अभिषेक, १० दिवसांचा दसरा, टिप्पर आणि शिमगा (होळी) हे गावातील प्रमुख धार्मिक कार्यक्रम आहेत. या वेळी सर्व ग्रामस्थ मोठ्या उत्साहाने एकत्र येतात!
कला, संस्कृती आणि व्यक्तिमत्त्व
पारंपरिक मूर्तीशाळा: कोनेवाडीमध्ये राजाराम मेस्त्री यांची पिढ्यानपिढ्या (पंजोबांपासून) चालत आलेली गणपती मूर्ती बनवण्याची पारंपरिक शाळा आहे. या शाळेत गणपती बाप्पांसोबत लाकडी गौरी सुद्धा बनवल्या जातात!
शिडवणे सुतार वाडीमध्ये देखील मूर्तीकार सुनिल पांचाळ यांची ' श्रीगणेश चित्रशाळा प्रसिद्ध आहे .
नामवंत व्यक्ती: सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय महादेव टक्के हे याच गावचे असून त्यांना राष्ट्रपती पोलीस पदक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
शेती आणि व्यवसाय
गावातील प्रमुख व्यवसाय शेती असून, भात हे मुख्य पीक आहे.
भातशेतीसोबतच नाचणी (नाचनी) सारखी पारंपरिक पिके घेतली जातात. आजही काही शेतकरी शेतीत बैलांचा वापर करतात.
कोकण भागात असल्यामुळे गावात काजू आणि आंब्याच्या बागा देखील आहेत.
रवळनाथ मंदिर: हे गावातील प्रमुख आणि प्राचीन मंदिर आहे. या मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.
गांगेश्वर मंदिर : भोवडवाडीतील या मंदिराची स्थापना १९३५ साली झाली. गावात गांगेश्वर देवाची एकूण चार मंदिरे आहेत.
दत्त मंदिर:गावठणवाडी येथे दत्त मंदिर असून तेथे दरवर्षी दत्तजयंतीला मोठा उत्सव साजरा होतो.
गावठण वाडीमध्ये शिडवणे गावठण वाडी उत्कर्ष मंडळ असून त्याचे अध्यक्ष चंद्रकांत शेट्ये आहेत. कार्यवाह - मंगेश शेट्ये आहेत. खजिनदार राजेंद्र शेट्ये असून सचिव विजय कुडतरकर आहेत. वाडी अध्यक्ष सदाशिव कुडतरकर आणि वाडीप्रमुख सचिन शेट्ये आहेत. सल्लागार बबन पाटणकर हे आहेत.
कोनेवाडीत खाजगी शिर्सेकर आणि सुतार यांचेही दत्त मंदिर आहे.
निगडादेवी मंदिर: हे मंदिर ब्राम्हण देव देवराईत स्थित आहे.
इतर मंदिरे: भराडी देवीचे स्थान आणि रवळनाथ मंदिराच्या जवळ असलेले पावणाई मंदिर ही इतर महत्त्वाची धार्मिक स्थळे आहेत.
🔹बौद्धवाडी : येथे बुरुड काम केले जाते . येथील बौद्धधर्मीय लोक सुंदर सुपे , बांबूच्या गृहोपयोगी वस्तू बनवतात . गणपतीच्या काळात गौरी सणासाठी लागणारी सुपे येथे मिळतात. या वाडीमध्ये गवळदेव आहे . बँजो मंडळ आहे . सुपे , रवळी , टोपल्या बनवणारे पारंपरिक व्यावसायिक आहेत . येथे बैलगाडा मंडळ आहे . येथे जवळच असलेल्या मंदिराजवळ बैलगाडा शर्यत झाली होती.त्यावेळी झालेल्या स्पर्धेत राज्यातील जवळच्या जिल्ह्यातील स्पर्धकांनी सहभाग घेतला होता .
जलस्रोत: निगुड पाणी (पूर्वी बारा महिने झरा वाहत होता) आणि गंगेची व्हाळी (पूर्वी जूनपर्यंत पाणी उपलब्ध असायचे, आता बोअरवेलमुळे पातळी आटली आहे) हे महत्त्वाचे जलस्रोत आहेत.
सामाजिक आणि सांस्कृतिक जीवन
गावात विविध सांस्कृतिक उपक्रम साजरे केले जातात.
करमणूक साधने (पूर्वीची): तमाशा, भजन आणि शिमग्यात गोफनृत्य हे करमणुकीचे पारंपरिक प्रकार होते.
बैलगाडा शर्यत: बौद्धवाडीजवळ असलेल्या निगडादेवी मंदिराजवळ बैलगाडा शर्यतीचे आयोजन केले गेले होते.
दळणवळण आणि वाहतूक
गावामध्ये दळणवळणाचा विकास टप्प्याटप्प्याने झाला आहे.
पायवाटा (पूर्वीच्या): गावात पूर्वी मांजर खिंड, अंबोनी खिंड, तळीची खिंड आणि शंकाची खिंड अशा प्रमुख पायवाटांचे जाळे होते.
रस्त्यांचा विकास:
* वारगाव ते नाधवडे रस्ता (1968 साली सुरू).
* शिडवणे - कोणेवाडी - तरळा रस्ता (1984 साली सुरू).
सार्वजनिक वाहतूक (एस.टी. बस):
* पहिली एस.टी. बस:1968 साली कोल्हापूर ते शिडवणे या मार्गावर सुरू झाली. नाना (रघूनाथ) रानडे यांनी यासाठी पुढाकार घेतला होता. सध्या ही बस तरेळे मार्गे धावत आहे.
* मुंबई मार्ग: 1971 साली मुंबई - खारेपाटण व्हाया शिडवणे, कणकवली मार्गे जाणारी बस सुरू झाली होती, पण हा मार्ग आता बंद झाला आहे.
प्रशासकीय आणि नागरी सुविधा
गावात मूलभूत नागरी सुविधा उपलब्ध आहेत.
नागरी सुविधा: ग्रामपंचायत, प्राथमिक शाळा आणि आरोग्य उपकेंद्र (PHC) यांसारख्या सुविधा आहेत.जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा दोन असून त्यांची नावे शाळा शिडवणे नं . १ आणि शाळा शिडवणे कोनेवाडी अशी आहेत .
आरोग्य आणि टपाल:
* पोस्ट शाखा: 1968 साली गावात आली.
* प्राथमिक आरोग्य उपकेंद्र (PHC):1989 साली सुरू झाले.
पाणी योजना: कोनेवाडीत 1985 साली प्रथम लघुनळ योजना मंजूर झाली.
अंतिम संस्कार व्यवस्था: गावात तीन स्मशानभूमी (उदा. शांतीधाम सार्वजनिक स्मशानभूमी) आणि एक कब्रिस्तान आहे.
जवळपासची गावे : नाधवडे , वारगाव , कुरंगवणे , शेर्पे , चिंचवली , साळीस्ते ==
शिडवणे
या विषयातील रहस्ये उलगडा.