देवनागरी, नंदीनागरी आणि इतर काही लिप्यांचा विकास नागरी लिपी पासून झाला आहे. नागरी लिपीचा उपयोग पूर्वी प्राकृत व संस्कृत भाषांमध्ये लिहीण्यासाठी केला जात असे. बऱ्याचदा नागरी लिपीला देवनागरी लिपीदेखील संबोधले जाते. इसवी सन पहिल्या सहस्रकादरम्यान नागरी लिपी प्रचलित झाली.
आद्यकालीन ब्राह्मी लिपीपासून नागरी लिपीचा विकास झाला. गुजरातमध्ये सापडलेल्या काही अतिप्राचीन शिलालेखांनुसार असे आढळून आले आहे की संस्कृत नागरी लिपीचा विकास आणि वापर प्राचीन भारतात इसवी सन पहिल्या ते चौथ्या शतकांदरम्यान झाला असावा. सातव्या शतकापर्यंत नागरी लिपीचा नियमित वापर होत असे. इसवी सनाच्या पहिल्या सहस्रक समाप्तीनजिक ही लिपी देवनागरी व नंदीनागरी लिपीमध्ये पूर्णपणे विकसित झाली असे संशोधकांना आढळून आले आहे.
नागरी लिपी
एका नवीन दृष्टिकोनातून पहा.