नाकानोशिमा (中之島) हे तोकारा द्वीपसमुहात स्थित एक ज्वालामुखीमुळे बनलेले बेट आहे. हा भाग कागोशिमा प्रीफेक्चर, जपान येथे आहे. तोशिमा गावातील बेटांपैकी हे सर्वात मोठे आणि सर्वाधिक लोकसंख्या असलेले बेट आहे. या बेटाचे क्षेत्रफळ ३४.४७ चौरस किमी (१३.३१ चौ. मैल) आहे. येथे स.न २००५ पर्यंत १६७ रहिवासी होते. या बेटावर कोणतेही विमानतळ नाही आणि मुख्य भूभागावरील कागोशिमा शहरात सात तासांच्या अंतरावर आहे. बेटवासी प्रामुख्याने शेती, मासेमारी आणि हंगामी पर्यटनावर अवलंबून आहेत. येथे एक वेधशाळा आणि स्थानिक संग्रहालय इतिहास आणि येथील लोककथा प्रसिद्ध आहेत.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →नाकानोशिमा (कागोशिमा)
जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.