नजीब तरकाई (२ फेब्रुवारी, १९९१ – ६ ऑक्टोबर, २०२०) हा अफगाणिस्तान कडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेला खेळाडू होता. हा १२ ट्वेंटी-20 आंतरराष्ट्रीय सामने आणि एक दिवसीय आंतरराष्ट्रीय सामने खेळला. तरकाईने बांगलादेशमध्ये २०१४ आयसीसी विश्व ट्वेंटी२० स्पर्धेत आंतरराष्ट्रीय पदार्पण केले. देशांतर्गत क्रिकेटमध्ये त्याने प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये २,००० पेक्षा अधिक धावा केल्या. २०१४आशियाई क्रीडा स्पर्धेत रौप्य पदक जिंकणाऱ्या अफगाणिस्तान संघाचा तो भाग होता.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →नजीब तरकाई
याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?