आकाशातले काही विशिष्ट तारकासमूह नक्षत्र ह्या नावाने ओळखले जातात. नक्षत्रांची यादी अथर्ववेद, तैत्तरीय संहिता, शतपथ ब्राह्मण यांत दिली आहे.
चंद्र आकाशात ज्या दीर्घ वर्तुळ मार्गातून भ्रमण करताना दिसतो त्या मार्गाला क्रांतिवृत्त म्हणतात. क्रांतिवृत्ताचे सत्तावीस समान भाग कल्पिले आहेत. त्यांतील प्रत्येकात येणाऱ्या एकेका तारकापुंजाला नक्षत्र म्हणतात. अशी एकूण २७ नक्षत्रे आहेत. म्हणून प्रत्येक नक्षत्राने क्रांतिवृत्तावर व्यापलेली जागा (३६० अंश भागिले २७ = १३° २०′) १३ अंश २० कला असते. प्रत्येक नक्षत्र हा परत ४ पदां मध्ये भागला गेला आहे.
आकाशात नक्षत्रांशिवाय इतरही अनेक तारकासमूह आहेत.
नक्षत्र
चला या जगात एक खोल डुबकी मारूया.