धूपपात्र

एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.

धूपपात्र

धूपपात्र तथा धूपदाणी हे धूप किंवा उदबत्ती जाळण्यासाठी वापरले जाणारे पात्र आहे. अनेक धर्म आणि संस्कृतींमध्ये वापरले जाणारे हे पात्र विविध आकारांत आणि धातूंमध्ये आढळतात. प्रामुख्याने तांबे, पितळ किंवा मातीपासून ही पात्रे तयार केली जातात. अनेक धूपपात्रांना धरण्यासाठी लांब दांडा किंवा साखळी असते, जेणेकरून धूर सर्वत्र फिरवणे सोपे जाते.

हिंदू धर्मात देवपूजा, आरती आणि धार्मिक विधींच्या वेळी वातावरणात सुगंध पसरवण्यासाठी आणि शुद्धीकरणासाठी याचा प्रामुख्याने वापर केला जातो. धूपपात्रात साधारणपणे कोळसा किंवा गोवरीचा पेटता तुकडा ठेवून त्यावर ऊद, गुग्गुळ किंवा चंदनाचे चूर्ण टाकले जाते, ज्यामुळे सुवासिक धूर निर्माण होतो.

सुगंधी धुराचा वापर मानसिक शांतता आणि रोगजंतूंच्या नाशासाठी केला जात असल्याचे उल्लेख आयुर्वेदातही आढळतात.

भारतात आढळणारी धूपपात्रे माती वा धातुचे बनविलेली असतात व यास धरावयास कडी असते. याची रचना उलट सुलट ठेविलेल्या वाट्यांसारखी असते. वरील खोलगट भाग हा निखारे ठेवण्याच्या कामी येतो तर खालचा भाग हा बैठकीचे काम करतो. यात पेटलेले निखारे टाकुन त्यावर राळ, चंदनचुरा, गुग्गुळ इत्यादी टाकतात.हे सर्व पदार्थ ज्वालाग्राही असल्यामुळे जळतात व त्याचा धूर होतो. त्यामुळे, घरातील जंतु मरतात वा बाहेर जातात.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →