धावडशी

हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.

धावडशी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्यातील सातारा तालुक्यातील एक गाव आहे. कोकणस्थ तांबे कुटुंब साताऱ्याला आले. विष्णूराव तांबे ब्रह्मेंद्र स्वामी यांच्या भक्त होते. त्यांच्या सहवासात तांबे कुटुंब कोकणातून धावडशी गाव येथे आले आणि तांबे वाडा बांधून राहीले. विष्णूराव यांचे पुत्र कृष्णराव तांबे. यांचा जन्म 1719 साली झाला. कृष्णाजी तांबे हे मोठे विद्वान आणि योद्धे होते. त्यांचे पराक्रमी ऐकून थोरले बाजीराव पेशवे यांना त्यांस पुण्यास बोलावून घेतले. कृष्णाजी यांनी थोरले बाजीरावांसह बुंदेलखंड लढाईत सहभागी झाले. नंतर त्यांस हमीरपूर आणि बांदा ही सुभेदारी मिळाली. कालांतराने पुन्हा त्यांस पुण्याला बोलावले. आणि बाजीरावांनी त्यांस पुण्यात तांबे वाडा बांधून दिला.‌

1759-60 दरम्यान पेशव्यांच्या सैन्यात ते उच्चपदावर होते. 1761 च्या तिसऱ्या पानीपत युद्धात त्यांना उत्तर दरवाजाचा सेनापती बनवले होते. नंतर ते महाराष्ट्रातील उमरखेड येथे स्थायी झाले. तेथेच 1738 मध्ये बळवंतराव पुत्र झाले. बळवंतराव हे चिमाजी अप्पा पेशवे यांच्या सानिध्यात होते. मराठा इंग्रज युद्धानंतर 1815 साली चिमाजी अप्पांसह ते काशीला गेले आणि अस्सी घाट शेजारी तांबे वाडा बांधून राहीले. बळवंतराव रावांस उमरखेड येथे 1803 मोरोपंत यांचा जन्म झाला. आणि ते आपल्या वडीलांसह काशीला गेले. काशी येथे 1826 ला त्यांचा विवाह दाक्षिणात्य सप्रे कुटुंबाची कन्या भागिरथीबाई यांच्याशी विवाह झाला. आणि 19 नोव्हेंबर 1835 रोजी त्यांस मनिकर्णिका नावाची कन्या झाली. हीच कन्या पुढे झाशीची राणी लक्ष्मीबाई नावाजली.

तांबे कुटुंबाची इतर शाखा आज ही धावडशी येथे राहतात.

तांबे कुटुंब कोकणातून धावडशी ह्या गावात आले. म्हणून या गावाला राणी लक्ष्मीबाई यांचे माहेर म्हणले जाते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →