धाराशिव जिल्हा (पूर्वीचा उस्मानाबाद जिल्हा) हा महाराष्ट्रातील मराठवाड्यातील एक जिल्हा आहे. धाराशिव हे शहर या जिल्ह्याचे मुख्य केंद्र आहे. प्राचीन काळापासून यास धाराशिव या नावाने ओळखले जात असल्याचे अनेक शिलालेखांमधील उल्लेखांमधून स्पष्ट होते. ७-८ व्या शतकांतील राष्ट्रकूट काळातील उल्लेख या दृष्टीने महत्त्वाचे आहेत. विसाव्या शतकाच्या सुरुवातीस, हैद्राबादचे ७ वे निजाम मीर उस्मान अली खानच्या काळात शहराला उस्मानाबाद हे नाव देण्यात आले होते. मात्र फेब्रुवारी २०२३ मध्ये या शहराचे व जिल्ह्याचे नाव धाराशिव करण्याचा निर्णय राज्य सरकरच्या वतीने घेण्यात आला. या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान दिल्या गेले. पुढील सुनावणी होईपर्यंत, म्हणजे १० जून २०२३ पर्यंत जिल्ह्याचे व तालुक्याचे नाव धाराशिव न वापरता उस्मानाबाद वापरा असा आदेश उच्च न्यायालयाने दिला. मात्र शहराचे नाव धाराशिव कायम आहे. यांचे जिल्हा मुख्यालय धाराशिव शहर येथे आहे. जिल्ह्याचा बहुतेक भाग खडकाळ आहे. जिल्ह्याचे एकूण क्षेत्रफळ ७५१२ चौरस किलोमीटर आहे. त्यातील २४१ किमी२ भाग हा शहरी आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →धाराशिव जिल्हा
एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.