धामणी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यातील एक गाव आहे. या गावात श्रीलक्ष्मीकेशवाचे प्राचीन देवालय आहे. कोकण आयुर फार्मा प्रा.ली. हा आयुर्वेदीय प्रकल्प याच गावात आहे. सीएनजी गॕस स्टेशन व दोन पेट्रोलपंप इथे उपलब्ध आहे. श्री.देवी वाघजाई , श्री. बाजीबुवा मंदिर ही क वर्ग ग्रामीण यात्रास्थळ आहेत. श्री. वरदायिनी मंदिर व लगतचा धबधबा प्रेक्षणीय आहे. बडदवाडी गणेश मंदिर हे देवालय जुनं आहे. वाघजाई मंदिरालगत देवराई जैवविविधतेचे माहेरघर आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →धामणी (संगमेश्वर)
याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?