धनबाद (संताली: ᱫᱷᱟᱱᱵᱟᱫᱽ) हे भारताच्या झारखंड राज्यातील एक प्रमुख शहर आहे. धनबाद शहर झारखंडच्या पूर्व भागात पश्चिम बंगाल राज्यांच्या सीमेजवळ वसले आहे व ते राजधानी रांचीच्या १४६ किमी ईशान्येस व कोलकात्याच्या २७० किमी वायव्येस स्थित आहे. २०११ साली धनबादची लोकसंख्या सुमारे ११.६ लाख होती.
धनबाद भारतातील कोळसा उद्योगाचे सर्वात मोठे केंद्र आहे. येथे अनेक कोळशाच्या खाणी असल्यामुळे भारताची कोळसा राजधानी असा खिताब धनबादला देण्यात येतो.
धनबाद
जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.