दृष्टी हा १९९० चा गोविंद निहलानी दिग्दर्शित भारतीय हिंदी भाषेतील नाट्यचित्रपट आहे, ज्यात डिंपल कपाडिया, शेखर कपूर आणि इरफान यांनी भूमिका केल्या होत्या. या चित्रपटात मुंबईतील उच्च-वर्गीय वातावरणातील शहरी जोडप्याचे वैवाहिक जीवन आणि त्यांच्यातील क्लेश, घटस्फोट आणि अनेक वर्षांच्या विभक्त झाल्यानंतरची भेट यांचे चित्रण केले आहे.
शास्त्रीय गायिका किशोरी आमोणकर यांचे संगीत दिग्दर्शन असलेला हा एकमेव चित्रपट आहे, ज्याचे गीत वसंत देव यांचे आहेत. १९९१ मध्ये, ३८ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये हिंदीतील सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार जिंकला, आणि ५५ व्या बंगाल चित्रपट पत्रकार संघाच्या पुरस्कारांमध्ये ५ व्या सर्वोत्कृष्ट भारतीय चित्रपटाचा दर्जा प्राप्त झाला. ह्यात डिंपल कपाडिया आणि मीता वसिष्ठ यांना हिंदी विभागातील सर्वोत्कृष्ट अभिनेत्री आणि सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री म्हणून गौरविण्यात आले.
दृष्टी (चित्रपट)
थोडक्यात पण महत्त्वाचे.