दुरंतो एक्सप्रेस ही भारत देशामधील भारतीय रेल्वेद्वारे चालवली जाणारी एक विशेष प्रवासी रेल्वे सेवा आहे. ह्या गाड्यांचे वैशिष्ट्य असे होते की त्या सुरुवातीच्या स्थानकापासून ते शेवटपर्यंत विनाथांबा धावत होत्या. त्यांचे थांबे केवळ तांत्रिक कारणांसाठी किंवा चमू बदलण्यासाठी होते. थांबे नसल्यामुळे दुरंतो एक्सप्रेस गाडी सध्या भारतामधील सर्वात वेगवान रेल्वे आहे. बरेचदा त्यांचा सरासरी वेग राजधानी अथवा शताब्दी गाड्यांपेक्षा देखील अधिक असतो. ब-याच दुरांतो गाड्या पूर्णपणे वातानुकुलीत असून त्यांचे डबे बाहेरून पिवळ्या-हिरव्या र्ंगाच्या नक्षीने रंगवले असतात. प्रवासादरम्यान खान-पान सेवेचे शुल्क भाड्यामध्ये समाविष्ट केलेले असते.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →दुरंतो एक्सप्रेस
याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.