दीवानगी (२००२ चित्रपट)

याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.

दीवानगी हा २००२ चा भारतीय हिंदी भाषेतील मानसशास्त्रीय थरारपट आहे जो अनीस बझ्मी दिग्दर्शित आणि नितीन मनमोहन निर्मित आहे. या चित्रपटात अजय देवगण, अक्षय खन्ना आणि उर्मिला मातोंडकर यांच्या भूमिका आहेत. चित्रपटाला इस्माईल दरबार यांनी संगीत दिले आहे, तर सलीम बिजनोरी आणि नुसरत बद्र यांनी गीते लिहिली आहेत. देवगणची ही पहिली नकारात्मक भूमिका होती ज्यासाठी त्याला सर्वोत्कृष्ट खलनायकाचा फिल्मफेर पुरस्कार मिळाला.

चित्रपटाचा पहिला भाग ग्रेगरी हॉब्लिट द्वारे बनवलेल्या प्राइमल फियर (१९९६) चित्रपटापासून रूपांतरित केला आहे, जो स्वतः विल्यम डायहल यांच्या त्याच नावाच्या कादंबरीवर आधारित होता. २५ ऑक्टोबर २००२ रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर व्यावसायिक यश मिळाले. २००३ मध्ये तमिळमध्ये कधल किरुक्कन आणि २००६ मध्ये तेलुगूमध्ये आदि लक्ष्मी या नावाने त्याची पुनर्निर्मिती करण्यात आला.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →