दिव्य देशम

हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.

दिव्य देशम( इंग्रजी: Divya Desams तमिळ: திவ்ய தேசம்) ही भगवान विष्णूंची निवासस्थाने आहेत. प्रख्यात तमिळ संत आळवार (Aazhwar ஆழ்வார் ) ह्यांच्या लिखाणात(दिव्य प्रबंधम) या निवासस्थानांचा उल्लेख आहे. ही सर्व मिळून १०८ आहेत .त्यापैकी १०५ भारतात आहेत, एक नेपाळ मध्ये, तर उरलेली दोन दिव्य जगतात आहेत.

दक्षिण भारतातील वैष्णव संप्रदायातील हिंदू मंडळी आयुष्यात एकदातरी ह्या १०६ देशांचे दर्शन व तीर्थयात्रा करण्याचा मनोदय करतात, आणि त्याद्वारे उर्वरित दोन देशांची प्राप्ती करण्याचा प्रयत्‍न करतात. दिव्य जगातील दोन देश म्हणजे प्रसिद्ध "क्षीरसागर" आणि "वैकुंठ" हे होत.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →