दिल्लीमधील जिल्हे

एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.

दिल्लीमधील जिल्हे

दिल्ली ह्या भारताच्या केंद्रशासित प्रदेशामध्ये एकूण अकरा प्रशासकीय किंवा महसूल जिल्हे आहेत, जे सर्व दिल्ली विभागांतर्गत येतात. प्रत्येक जिल्ह्यच्या प्रमुखपदी एक जिल्हाधिकारी असून दिल्ली सरकारची धोरणे व कायदे राबवणे हे ह्या जिल्हाधिकाऱ्यांचे कर्तव्य आहे. जो दिल्लीच्या विभागीय आयुक्त (महसूल प्रधान सचिव) यांना अहवाल देतो., हे ११ जिल्हे दिल्लीच्या ३३ उपविभागांमध्ये विभागलेले आहेत, प्रत्येकासाठी एक उपजिल्हाधीकारी (SDM) नेमलेला असतो.

नवी दिल्ली भारताची राजधानी म्हणून काम करते आणि सरकारच्या तिन्ही शाखा, कार्यकारी (राष्ट्रपती भवन), विधिमंडळ (संसद भवन) आणि न्यायपालिका (सर्वोच्च न्यायालय) यांचे स्थान आहे. त्याचप्रमाणे, दिल्ली १५ पोलिस जिल्ह्यांमध्ये विभागली गेली आहे, प्रत्येकासाठी जिल्हा पोलीस अधीक्षकाची (DCP) नेमणूक केलेली असते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →