दिल्ली विधानसभा निवडणूक, २०१५

एका नवीन दृष्टिकोनातून पहा.

दिल्ली विधानसभा निवडणूक, २०१५

दिल्ली विधानसभा निवडणूक २०१५ ही भारताच्या दिल्ली राज्यातील विधानसभा निवडणुक होती. ७ फेब्रुवारी २०१५ रोजी एकाच फेरीत घेण्यात आलेल्या ह्या निवडणुकीमध्ये दिल्ली विधानसभेमधील सर्व ७० जागांसाठी नवे आमदार निवडले गेले. मागील निवडणुकीनंतर मुख्यमंत्रीप्दावर आलेले व केवळ ४९ दिवस टिकलेले अरविंद केजरीवाल ह्यांच्या नेतृत्वाखालील आम आदमी पार्टीने ह्या निवडणुकीत ७० पैकी ६७ जागांवर विजय मिळवून सपशेल बहुमत मिळवले. भाजपला केवळ ३ जागांवर समाधान मानावे लागले तर काँग्रेसला खाते उघडण्यात देखील अपयश आले. ७० पैकी ६३ जागांवरील काँग्रेस उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले. भारताच्या निवडणूक इतिहासामधील हा सर्वात दमदार विजयांपैकी एक मानला जातो.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →