उत्तराखंड विधानसभा निवडणूक, २०१७

हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.

उत्तराखंड विधानसभा निवडणूक, २०१७

उत्तराखंड विधानसभा निवडणूक २०१७ ही भारताच्या उत्तराखंड राज्यातील एक विधानसभा निवडणुक आहे. १५ फेब्रुवारी २०१७ रोजी घेतल्या गेलेल्या ह्या निवडणुकीमध्ये उत्तराखंड विधानसभेमधील सर्व ७० जागांसाठी नवे आमदार निवडण्यात आले. मागील निवडणुकीत विजय बहुगुणा ह्यांच्या नेतृत्वाखाली भारतीय राष्ट्रीय काँग्रेसला ३२ जागांवर विजय मिळाला होता. काँग्रेसने बहुजन समाज पक्ष, उत्तराखंड क्रांती दल व अपक्षांना हाताशी धरून सरकार स्थापन केले होते.

११ मार्च २०१७ रोजी जाहीर करण्यात आलेल्या निकालांमध्ये भारतीय जनता पक्षाने ७० पैकी ५७ जागांवर विजय मिळवून आपले वर्चस्व निर्विवाद सिद्ध केले. काँग्रेस पक्षाला केवळ ११ जागांवर समाधान मानावे लागले तर उर्वरित दोन जागांवर अपक्ष उमेदवारांनी विजय मिळवला.

भाजपने विधिमंडळ पक्षनेतेपदी त्रिवेंद्र सिंह रावत ह्यांची निवड केली व १८ मार्च २०१७ रोजी रावत ह्यांनी उत्तराखंडच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →