दिनकर दत्तात्रेय भोसले

याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?

दिनकर दत्तात्रेय भोसले (जन्म-२१ नोव्हेंबर, इ.स. १९३० मृत्यू- २९ मे, इ.स. २०११) यांनी चारुता सागर या नावाने कथालेखन तर धोंडू बुवा कीर्तनकार या नावाने कीर्तने केली. सांगली जिल्ह्यातील कवठेमहांकाळ जवळचे मळणगाव हे त्यांचे मूळ गाव. तिथेच त्यांनी प्राथमिक शाळेत शिक्षक म्हणूनही नोकरी केली होती. राष्ट्रीय पुरस्कार विजेता जोगवा हा मराठी चित्रपट, चारुता सागर यांच्या दर्शन या कथेवर आधारलेला आहे. डॉ. चंद्रकांत पोकळे यांनी चारुता सागर यांच्या 'नागीण', 'कुठे वाच्यता नसावी', 'म्हस', 'न लिहिलेले पत्र', 'पुंगी', 'पूल', 'वाट', 'दर्शन', 'नदीपार', 'रैतूना', 'मामाचा वाडा' आदी कथांचे कन्नड भाषेत भाषांतर केलेले आहे.

सुरुवातीला चारुता सागर यांनी लष्करात काम केले होते. काही दिवसांनी त्यांनी लष्करातली नोकरी सोडली आणि बिहार-बंगालमध्ये भ्रमंती केली. बंगालमध्ये फिरत असताना त्यांनी शरच्चंद्र चट्टोपाध्याय यांच्या सर्व कादंबऱ्या वाचून काढल्या. चटर्जींच्या एका कादंबरीत एका पात्राचे नाव चारुता सागर असे आहे. ते नाव त्यांना आवडल्यामुळे त्याच नावाने त्यांनी आपले लेखन सुरू केले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →