.
दासो दिगंबरपंत देशपांडे ऊर्फ दासोपंत (इ.स. १५५१ - इ.स. १६१६) हे मराठी भाषेच्या इतिहासातील सर्वाधिक लेखन करणारे संत-कवी होते. यांचा जन्म शके १४७३मध्ये अधिक भाद्रपद कृष्ण अष्टमी रोजी सोमवारी झाला होता. ते संत एकनाथांचे समकालीन होते. दासोपंत दत्तात्रेयांचे परम भक्त होते. यांच्या एकूण रचनांची संख्या सुमारे ५ लाख ओव्यांपर्यंत समजली जाते. त्यांनी काही लिखाण दिगंबरानुचर या टोपणनावाखाली केले आहे.त्यांना संत सर्वज्ञ दासोपंत असेही म्हणतात.
संत सर्वज्ञ दासोपंत हे इसवी सनाच्या १६-१७ व्या शतकात होऊन गेले. मध्ययुगातील नाथपंचक म्हणजे संत एकनाथ, जनीजनार्दन, रामा जनार्दन, विठा रेणुकानंदन आणि संत सर्वज्ञ दासोपंत हे होय.
या पंचकांतीलच नव्हे तर एकूणच आजवरच्या संत काव्यांत सर्वाधिक, प्रचंड काव्यनिर्मिती करणारे संत म्हणजे दासोपंत होत. त्यांनी केवळ अफाट साहित्य निर्माण केले, असे नाही तर त्यातील वैविध्य, वैचित्र्य, विलक्षणता यामुळे त्यांचे साहित्य संत काव्यांत आपली विशिष्टता सिद्ध करते. त्यांनी अंबाजोगाईत मंदिर परंपरेत धर्मसंप्रदायी उपासनेला कलात्मक अधिष्ठान दिले.
दासो दिगंबर देशपांडे
तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!