दलित पँथर

जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.

दलित पॅंथर ही बौद्ध-दलित समाजहित या तत्त्वावर आधारलेली संघटना २९ मे इ.स. १९७२ साली उदयास आली. सामाजिक विचारांचे प्रबोधन हा संघटनेचा गाभा आहे. दलित पॅंथर 'लोकशाही मध्यवर्तित्व' हे संघटनेचे प्रमुख तत्त्व उराशी बाळगून जात, धर्म, वर्ण-विरहित, शोषणमुक्त, सुखी, समृद्ध, सुसंस्कृत, विज्ञानी व एकजिनसी समाजनिर्मितीचे पायाभूत उद्दिष्ट समोर ठेवून मार्गक्रमण करीत आहे. प्रामुख्याने मागास, कष्टकरी, कामगार, भूमिहीन, शेतमजूर, गरीब शेतकरी, भटक्या जाती-जमाती, आदिवासी या घटकांना घेऊन सामाजिक लढा उभारण्यात अग्रणी असणारी संघटना म्हणून समाजात ओळखली जाते.



पद्मश्री नामदेव ढसाळ यांच्या निधनाने रिक्त झालेल्या दलित पॅंथरच्या अध्यक्षपदी त्यांच्या पत्नी मल्लिका नामदेव ढसाळ यांची एकमताने निवड करण्यात आली आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →