दम लगा के हैशा (आंतरराष्ट्रीय स्तरा माय बिग फॅट ब्राइड म्हणून प्रदर्शित झाला) हा २०१५ चा भारतीय हिंदी -भाषेतील रोमँटिक कॉमेडी-नाट्यचित्रपट आहे जो शरत कटारिया लिखित आणि दिग्दर्शित आहे, ज्यात आयुष्मान खुराना आणि भूमी पेडणेकर, संजय मिश्रा आणि सीमा पाहवा मुख्य भूमिकेत आहेत. चित्रपटाचा पार्श्वसंगीत इटालियन संगीतकार अँड्रिया गुएरा यांनी तयार केला आहे. हा चित्रपट २७ फेब्रुवारी २०१५ रोजी प्रदर्शित झाला आणि त्याला चांगला प्रतिसाद मिळाला. बॉक्स ऑफिस इंडियाने सांगितले की चित्रपटाने ४२ कोटी (US$९.३२ दशलक्ष) पाच आठवड्यात मिलवले. चित्रपटाची अंतिम जागतिक कमाई ७१.८५ कोटी (US$१५.९५ दशलक्ष) होती.
दम लगा के हैशाला ६१ व्या फिल्मफेर पुरस्कारांमध्ये पाच नामांकन मिळाले व दोन जिंकले, पेडणेकरसाठी सर्वोत्कृष्ट महिला पदार्पण आणि सर्वोत्कृष्ट सिनेमॅटोग्राफी. "मोह मोह के धागे" या गाण्याला वरुण ग्रोव्हरच्या गीतासाठी आणि पापोन आणि मोनाली ठाकूर यांच्या गायनासाठी तीन नामांकन मिळाले आहेत. या चित्रपटाला हिंदीतील सर्वोत्कृष्ट फीचर फिल्मचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारही मिळाला. हा चित्रपट २०१० च्या मराठी चित्रपट अगडबम वरून प्रेरित आहे जो २००६ च्या तेलगू चित्रपट किथाकिथालू वरून प्रेरित आहे.
चित्रपटाची कथा हरिद्वार आणि ऋषिकेशवर बेतलेली आहे व ह्याच शहरांमध्ये चित्रित केला गेला आहे.
भूमी पेडणेकरची फिमेल लीडसाठी निवड झाली, हा तिचा पहिला चित्रपट आहे. या भूमिकेसाठी अभिनेत्रीचे वजन जास्त असणे आवश्यक होते परिणामी, तिने ३० किलोने वजन वाढवले.
दम लगा के हईशा
याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.