दत्तात्रय दामोदर डबके किंवा डी.डी. डबके हे १९१३ मध्ये दादासाहेब फाळके दिग्दर्शित राजा हरिश्चंद्र या पहिल्या भारतीय पूर्ण लांबीच्या मूकपटातील अभिनेते होते.
त्यांनी अण्णा साळुंके यांच्यासोबत काम केले होते. त्यांनी सत्यवादी राजा हरिश्चंद्र (१९१७), लंका दहन (१९१७), श्री कृष्ण जन्म (१९१८) या तीन चित्रपटांमध्ये देखिल काम केले होते. नंतर ते सिनेमॅटोग्राफर तसेच दिग्दर्शक बनले. १९२४ मध्ये राजा हरिश्चंद्रचा रिमेक त्यांनी दिग्दर्शित केला होता.
दत्तात्रय दामोदर डबके
एका नवीन दृष्टिकोनातून पहा.