दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाचा भारत दौरा, २०२२

चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.

दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाचा भारत दौरा, २०२२

दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघ जून २०२२ पाच आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने खेळण्यासाठी भारताचा दौरा केला. सप्टेंबर २०२१ मध्ये भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने हा दौरा निष्चित केला. मालिकेपूर्वी दुखापत झाल्याने लोकेश राहुलच्या जागी ऋषभ पंतला भारताचा कर्णधार नेमले.

दक्षिण आफ्रिकेने पहिला सामना जिंकत मालिकेत आघाडी घेतल्याने सलग सर्वाधिक आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने जिंकण्याचा विश्वविक्रम भारताकडून हुकला गेला. दुसराही सामना दक्षिण आफ्रिकेने जिंकला. तिसऱ्या आणि चौथ्या सामन्यात भारताने विजय मिळवून मालिका २-२ अश्या बरोबरीच्या स्थितीत आणून ठेवली होती. शेवटच्या ट्वेंटी२० सामन्यात पावसाचा व्यत्यत आल्याने केवळ ३.३ षटकांनंतरच उर्वरीत सामना रद्द करावा लागला. त्यामुळे पाच सामन्यांची आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० मालिका २-२ अशी बरोबरीत सुटली.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →