दंडशास्त्र

एका नवीन दृष्टिकोनातून पहा.

दंडशास्त्र : गुन्हाकरिता देण्यात येणाऱ्या शिक्षेसंबंधीचे शास्त्र. प्रत्येक समाजात गुन्हांचा प्रतिकार दंडनाने केला जातो. दंडशास्त्रात शिक्षा का करायची, शिक्षेचे हेतू काय, शिक्षा कशी असावी आणि त्याचा प्रत्यक्ष व संभाव्य गुन्हेगारावर काय परिणाम होतो, या प्रश्नांचा विचार केला जातो. दंडशास्त्राचा मुख्य उद्देश गुन्हा व शिक्षा यांमधील परस्परसंबंधाची लोकांना जाणीव करून देणे हा असला पाहिजे.

वप्राचीन काळी ‘पाप’ आणि ‘गुन्हा’ यात भेद केला जात नसे. आधुनिक दंडशास्त्रात असा भेद केला जातो. ‘पाप’ हे नीतिशास्त्राच्या कक्षेत येते. ज्या काळात धर्म व रूढी या कायद्याच्या प्रमुख प्रेरणा होत्या, त्या काळात पाप केल्यास दंडशास्त्राप्रमाणे शिक्षा होत असे. हिंदू धर्मशास्त्रात प्रायश्चित हे मुख्यतः पापाचे क्षालन होण्यासाठी घेतले जात असे. प्रायश्चित्ताने पाप नाहीसे होऊन पाप करणारा शुद्ध होतो. पाश्चात्य दंडशास्त्रातसुद्धा शुद्धीकरणाचा विचार प्लेटोपासून टॉमस अक्वाय्‌नसपर्यंत व कांटपासून टी. एच्. ग्रीनपर्यंत अनेक तत्त्ववेत्यांनी मांडला.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →