द ॲशेस

एका नवीन दृष्टिकोनातून पहा.

द ऍशेस ही इंग्लंड व ऑस्ट्रेलिया ह्या दोन देशांदरम्यान खेळली जाणारी ऐतिहासिक कसोटी क्रिकेट मालिका आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ही सर्वात जुनी व मानाची मालिका मानली जाते. सर्वात पहिली ऍशेस मालिका १८८२-८३ साली ऑस्ट्रेलियामध्ये खेळवली गेली. सध्या ऍशेस दोन वर्षातून एकदा खेळवली जाते व दोन्ही देश आलटुन पालटुन ह्या मालिकेचे आयोजन करतात. सर्वसाधारणपणे ऍशेस मालिकेत ५ कसोटी सामने असतात. जर मालिका बरोबरीत सुटली तर मागील विजयी टीमकडे ऍशेसचा चषक राहतो. ह्या मालिकेला ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे.

१८८२ साली पहिल्या ऍशेस मालिकेत एकच सामना ओव्हल या मैदानावर खेळला गेला. या रोमहर्षक सामन्यात ऑस्ट्रेलिया ने पहिल्या डावात केवळ ६३ धावा केल्या. पण इंग्लंडचा संघ ही केवळ १०१ धावाच करु शकला. दुसऱ्या डावात देखील ऑस्ट्रेलिया संघ १२२ पर्यत मजल मारु शकला. अखेर इंग्लंडला विजयासाठी केवळ ८५ धावाच हव्या होत्या. पण इंग्लंड फक्त ७८ धावाची मजल मारु शकला. त्याचे अखेरचे ४ फलंदाज केवळ २ धावांमध्ये बाद झाले. हा ऑस्ट्रेलियाचा इंग्लंडमधील पहिला विजय होता. इंग्लिश वुत्तपत्रांनी ह्या पराजयाचे वर्णन "ओव्हल येथे इंग्लंडच्या क्रिकेटचा मृत्यू झाला" असे केले.

सध्या ॲशेस चषक ऑस्ट्रेलियाकडे आहे. त्यांनी इंग्लंडला २०२१-२२च्या मालिकेत ४-० अशी धुळ चारून ॲशेस चषक राखला आहे. पुढील आवृत्ती २०२३ मध्ये अपेक्षित आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →