द मदर्स अजेंडा

चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.

द मदर्स अजेंडा - (श्रीमाताजींबरोबरील संवाद) हा १३ खंडांचा पुस्तक-संच आहे. श्रीमाताजी अतिमानसाच्या अवतरणानंतर शरीराचे रूपांतरण करण्याच्या प्रयत्नांत होत्या. १९५१ ते १९७३ या बावीस वर्षांच्या कालावधीत त्यांनी जे प्रयत्न केले त्याच्या तपशिलवार नोंदी या खंडांमध्ये केलेल्या आहेत. सत्प्रेम आणि सुजाता नहार यांच्याबरोबर श्रीमाताजींनी केलेल्या संवादाच्या या नोंदी आहेत. साधारण ६००० पानी हे लिखाण आहे. हे संवाद टेपरेकॉर्डरवर उपलब्ध आहेत. एकंदरच मानवी उत्क्रांतीच्या वाटचालीचा अभ्यास करणाऱ्या संशोधकांना या नोंदी उपयुक्त ठरतील अशा आहेत.

आधुनिक भौतिकशास्त्राच्या सिद्धांताच्या जवळ जातील अशा प्रकारचे अनुभव यामध्ये नोंदविण्यात आले आहेत. श्रीअरविंद यांच्या तत्त्वज्ञानानुसार मानवानंतर अतिमानव आणि त्यानंतर अतिमानसिक जीव या दोन श्रेणी उत्कांतीमध्ये उदयाला येणार आहेत. त्याच्या पाऊलखुणा या प्रयोगामध्ये पाहायला मिळतात.

१९५४ पासून सत्प्रेम श्रीमाताजींबरोबर होणाऱ्या संवादाचे शब्दांकन करत असत. तेच लिखाण पुढे द मदर्स अजेंडा या नावाने प्रकाशित करण्यात आले. या लिखाणाचे टंकलेखन करण्याची जबाबदारी सुजाता नहार यांच्यावर सोपविण्यात आली.

१९७८ मध्ये सत्प्रेम आणि सुजाता, द मदर्स अजेंडा (श्रीमाताजींबरोबरील संवाद) या १३ खंडांच्या पुस्तक-प्रकल्पावर काम करू लागले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →