द ब्लिट्झ

एका नवीन दृष्टिकोनातून पहा.

द ब्लिट्झ

द ब्लिट्झ ही जर्मन वायुसेनेने (लुफ्तवाफे) दुसऱ्या महायुद्धादरम्यान १९४०-४१मध्ये युनायटेड किंग्डमवर केलेल्या बोम्बफेक मोहीम होती. बॅटल ऑफ ब्रिटन या लढाईच्या अंतापासून सुरू झालेल्या या मोहिमेत लुफ्तवाफेने इंग्लंडमधील औद्योगिक वसाहती, शहरे व गावांवर तुफान बॉद्चफेक केली होती. याची सुरुवात लंडनवरील हळ्ळ्यांनी झाली. बॅटल ऑफ ब्रिटनमध्ये मात लुफ्तवाफेने या हळ्ळ्यांनी रॉयल एर फोर्सच्या विमानांना मोकळ्या मैदानात खेचण्यासाठीचा हा व्यह होता. ६ सप्टेंबर १९४० पासून ५७ पैकी ५६ दिवस लंडनवर बॉम्बफेक झाली.

या मोहीमेत इंग्लंडमधील ४३,००० ते ४६,००० नागरिक ठार झाले आणि सुमारे सव्वा लाख नागरिक जखमी झाले. याशिवाय अंदाजे वीस लाख घरे व इमारती सुद्धा उद्ध्वस्त झाल्या. या तुफान हल्ल्यांनतरही लुफ्तवाफेला इंग्लंडवर हवाई वर्चस्व मिळवता आले नाही.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →