द फॅन्टम टोलबुथ ही लहान मुलांसाठी लिहिलेली कल्पनारम्य साहसी कादंबरी आहे. याचे लेखल जी नॉर्टन जस्टर आहेत. याचे चित्र स्पष्टीकरण ज्युलस फेफर यांनी दिले आहे. इ.स. १९६१ मध्ये रॅंडम हाऊस (यूएसए) ने हे प्रथम प्रकाशित केले. ही एका मिलो नावाच्या कंटाळलेल्या तरुण मुलाची कहाणी आहे. एका दुपारी अनपेक्षितपणे त्याला जादूचा टोलबूथ मिळतो. काहीही चांगले करायला नसल्यामुळे, तो त्याच्या खेळण्यातला गाडीवर बसतो आणि टोलबूथ म्हणजेच टोलनाक्यात गाडी घालतो. यामुळे तो त्याला विस्डमच्या राज्यात जातो. हे राज्य एकेकाळी फार संपन्न होते पण सध्या फार अडचणीत असते. तेथे त्याला दोन विश्वासू साथीदार मिळताता. तो तेथील बंदिवान राजकन्येला सोडवण्याच्या कामगिरीवर निघतो. त्याच्या साथीदारांचे नाव राईम आणि रीजन असते. राजकन्या हवेत असणाऱ्या किल्ल्यात कैद असते. या प्रक्रियेत, तो मौल्यवान धडे शिकतो, तसेच तो शिकण्याच्या प्रेमात पडतो. या पुस्तकाचा मजकूर हा भरपूर शब्दकोट्या आणि शब्दांच्या खेळांनी भरलेला आहे. उदा. मिलो अजाणतेपणाने विस्डममधील एक बेट कन्क्लुझन्सवर कूच करते तेव्हा अशा प्रकारच्या म्हणींचा शाब्दिक अर्थ शोधतो.
इ.स. 1958 मध्ये, जस्टर यांना त्यांनी लिहिलेल्या मुलांच्या शहरांबद्दलच्या पुस्तकासाठी फोर्ड फाऊंडेशनचे अनुदान मिळाले होते. परंतु त्यांना त्या प्रकल्पावर काही कारणास्तव पुढे काम करता आले नाही. पण त्यातूनच त्यांनी त्यांचे पहिले पुस्तक 'फॅन्टम टोलबुथ' बनवले. त्यांचा घर सोबती, फीफर, हा एक व्यंगचित्रकार होता. त्याने या प्रकल्पात स्वतः रस दाखवला आणि कामही केले. रॅन्डम हाऊसचे संपादक जेसन एपस्टाईन यांनी पुस्तक विकत घेऊन प्रकाशित केले. पुस्तकाला अतिशय उत्तम प्रतिसाद मिळाला. पुस्तकाच्या अपेक्षेपेक्षा कितीतरी अधिक म्हणजेच तीस लाख प्रती विकल्या आहेत. या पुस्तकावरून चित्रपट, ऑपेरा आणि नाटक बनवले आहे. हे पुस्तक बऱ्याच भाषांमध्ये भाषांतरित केले गेले.
वरवर पाहता हे पुस्तक एक साहस कथा आहे, परंतु यात मुखत्वे शिक्षणावरील प्रेमाची गरज दाखवली आहे. यात मिलो शाळेत शिकलेल्या गोष्टी बापरून त्याच्या वैयक्तिक आयुष्यात प्रगती करतो आणि पूर्वी ज्या जीवनाचा कंटाळा आलेला असतो त्याच जीवनावर प्रेम करण्यास शिकतो. समीक्षकांनी या पुस्तकाची तुलना लुईस कॅरोल लिखित ॲलिस ॲडवेंचर इन वंडरलॅंड आणि एल. फ्रँक बाऊमच्या द वंडरफुल विझार्ड ऑफ ओझ सारख्या पुस्तकांची केली आहे.
द फँटम टोलबूथ
जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.