थोरले शाहू महाराज

याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?

थोरले शाहू महाराज (जन्म : १८ मे १६८२; -गांगवली-माणगांव रायगड, १५ डिसेंबर १७४९; सातारा) हे छत्रपती शिवाजी महाराजांचे पुत्र संभाजी महाराज यांचे चिरंजीव. जन्मापासूनच हे १७ वर्ष मोंगल बादशहा औरंगजेबाच्या कबजामध्ये होते राजाराम यांचा मृत्यू झाल्यानंतर राणी ताराबाई हिने राज्यकारभार करायला सुरुवात केली. तिला शह बसावा म्हणून औरंगजेबाने शाहूला सोडून दिले. ताराबाईच्या सैन्याशी शाहूच्या सैनिकांनी केलेल्या लढाईनंतर झालेल्या तहान्वये राज्याची वाटणी झाली व थोरल्या शाहूंना साताऱ्याला राज्य स्थापन करण्याची परवानगी मिळाली. साताऱ्याला या थोरल्या शाहूंनी इ.स. १७०७ पासून ते मरेपर्यंत म्हणजे १५ डिसेंबर इ.स.१७५२ पर्यंत राज्य चालविले.

साताऱ्याची राज्य गादी ही थोरली गादी म्हणून ओळखली जाई. मराठा साम्राज्याचे पंतप्रधान पेशवे यांना या गादीकडूनच कारभाराची वस्त्रे घ्यावी लागत. थोरले शाहू युद्ध करीत नसले तरी त्यांच्या काळात मराठ्यांनी बाळाजी विश्वनाथ ते राघोबादादा आणि चिमाजी अप्पा यांनी उत्तर हिंदुस्थानचा अटकेपर्यंत प्रदेश जिंकून दाखविला.

या शाहू महाराजांचे ’छत्रपती थोरले शाहू महाराज (सातारा)’ या नावाचे चरित्र आसाराम सैंदाणे यांनी लिहिले आहे. प्रतिमा प्रकाशन पुणे येथे छापवून घेतलेल्या या पुस्तकाचे प्रकाशन निनाद बेडेकर यांच्या हस्ते २ फेब्रुवारी २०१५ रोजी झाले. त्यापूरवी चिं.गं. गोगटे यांचे

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →