त्र्यंबकराव दाभाडे

या विषयातील रहस्ये उलगडा.

त्र्यंबकराव दाभाडे (?? – २८ एप्रिल, १७३१:डभोई, गुजरात, भारत) हे १७२९ ते १७३१ या काळात मराठा साम्राज्याचे सरसेनापती होते. ते खंडेराव दाभाडे आणि उमाबाई दाभाडे यांचे पुत्र होते.

दाभाडे घराण्याने मुघल साम्राज्याच्या समृद्ध गुजरात प्रांतावर अनेक वेळा स्वाऱ्या करून तिथून चौथाई आणि सरदेशमुखी कर गोळा केला होता. १७२९ मध्ये खंडेरावांच्या मृत्यूनंतर त्र्यंबकराव सरसेनापती झाले. छत्रपती शाहू यांच्या पेशवे थोरले बाजीराव पेशवे यांनी गुजरातमधील करसंकलन आपल्या हातात घेण्याचा प्रयत्न केला असता, दाभाडे घराण्याने या निर्णयाला विरोध केला. त्र्यंबकरावांना हैदराबादचा निजाम, गायकवाड आणि कदमबांडे यांसारख्या पारंपरिक गुजरातवरील मराठा सरदारांचा आणि शाहूंच्या प्रतिनिधी व सामंतांचा पाठिंबा मिळाला.

२८ एप्रिल १७३१ रोजी डभोईच्या लढाईत त्यांचा मावस भाऊ भाऊसिंह ठोके याने गोळी झाडून त्यांचा वध केला.

त्र्यंबकरावांच्या मृत्यूनंतरही छत्रपती शाहू आणि बाजीराव यांनी दाभाडे घराण्याशी वैर वाढवण्याचे टाळले. त्यांनी त्र्यंबकरावांचे बंधू यशवंतराव दाभाडे यांना नवीन सरसेनापती नेमले. तसेच, दाभाडे घराण्याला गुजरातमधील चौथाई गोळा करत राहण्याची परवानगी देण्यात आली, पण अटीप्रमाणे त्यातील निम्मी रक्कम सातारा दरबारात जमा करणे बंधनकारक होते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →