त्रिपुराचा मुख्यमंत्री हा भारताच्या त्रिपुरा राज्याचा सरकारप्रमुख आहे. भारतीय संविधानानुसार राज्यप्रमुख जरी राज्यपाल असला तरी राज्याची सर्व सुत्रे व निर्णयक्षमता मुख्यमंत्र्याच्या व त्याच्या मंत्रीमंडळाच्या हातात असते. त्रिपुरा विधानसभा निवडणुकीमध्ये सर्वाधिक जागा मिळवणाऱ्या राजकीय पक्षाला राज्यपाल सरकारस्थापनेसाठी आमंत्रित करतो. त्या पक्षाच्या विधिमंडळ समितीद्वारे मुख्यमंत्र्याची निवड केली जाते. बहुमत सिद्ध करून मुख्यमंत्री आपल्या पदावर पाच वर्षे राहू शकतो.
गेल्या अनेक दशकांपासून त्रिपुराच्या राजकारणावर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस व मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षांचे वर्चस्व राहिले आहे. १९९८ ते २०१८ दरम्यान सलग ५ वेळा माकपचे माणिक सरकार राज्याच्या मुख्यमंत्रीपदावर निवडून आले. पर्ंतु २०१८ सालच्या विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने प्रथमच राज्यात मुसंडी मारली व ६० पैकी ६३ जागांवर विजय मिळवून २/३ बहुमत प्राप्त केले. मार्च २०१८ पासून भाजपचे बिपलब कुमार देब मुख्यमंत्रीपदावर आहेत.
त्रिपुराचे मुख्यमंत्री
चला या जगात एक खोल डुबकी मारूया.