कर्नाटकचा मुख्यमंत्री हा भारताच्या कर्नाटक राज्याचा सरकारप्रमुख आहे. भारतीय संविधानानुसार राज्यप्रमुख जरी राज्यपाल असला तरी राज्याची सर्व सुत्रे व निर्णयक्षमता मुख्यमंत्र्याच्या व त्याच्या मंत्रीमंडळाच्या हातात असते. कर्नाटक विधानसभा निवडणुकीमध्ये सर्वाधिक जागा मिळवणाऱ्या राजकीय पक्षाला राज्यपाल सरकारस्थापनेसाठी आमंत्रित करतो. त्या पक्षाच्या विधिमंडळ समितीद्वारे मुख्यमंत्र्याची निवड केली जाते. बहुमत सिद्ध करून मुख्यमंत्री आपल्या पदावर पाच वर्षे राहू शकतो. १९४७ सालापासून २०२५पर्यंत ३८ वेळा सत्तांतर झाले असून २३ व्यक्ती कर्नाटकाच्या मुख्यमंत्रीपदावर राहिले आहेत.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →कर्नाटकचे मुख्यमंत्री
जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.