त्यांजिन (देवनागरी लेखनभेद: त्यांचिन ; चिनी: 天津 ; फीनयीन: Tiānjīn ) हे चीनच्या जनता-प्रजासत्ताकाच्या ईशान्य भागातील एक महानगर आहे. चिनी जनता-प्रजासत्ताकाच्या प्रांतीय दर्जाच्या चार महानगरी क्षेत्रांपैकी हे एक महानगरी क्षेत्र आहे. हे महानगर हाय नदीच्या तीरावर वसले असून याच्या पूर्वेस पिवळ्या समुद्राचा भाग असलेले बोहाय आखात पसरलेले असून उर्वरीत बाजूंस याच्या सीमा हपै प्रांतास आणि पैचिंग महानगरी क्षेत्रास भिडल्या आहेत.
लोकसंख्येच्या निकषानुसार षांघाय, पैचिंग, क्वांग्चौ या महानगरांपाठोपाठ त्यांजिन चौथे मोठे महानगर आहे.
त्यांजिन
एका नवीन दृष्टिकोनातून पहा.