तोक्यो (अन्य लेखनभेद: टोक्यो, टोकियो ; जपानी: 東京都; रोमन लिपी: Tokyo; अधिकृत नावः तोक्यो महानगर (東京都 - तोऽक्योऽ तो)) ही जपान देशाची राजधानी व सगळ्यात मोठे शहर आहे. तोक्यो हा जपानमधील ४७ पैकी एक प्रांत (प्रांत), तसेच जपानमधील सर्वात मोठ्या महानगरीय प्रदेशाचे केंद्रस्थान आहे.
तोक्यो महानगरीय प्रांतामध्ये २३ विभाग (वॉर्ड) असून एकूण ३९ महानगरपालिका ह्या प्रांताच्या हद्दीत येतात. ह्यांची लोकसंख्या सुमारे १.३ कोटी इतकी आहे. ३.५ कोटी एकत्रित लोकसंख्या असलेला हे जगातील सर्वाधिक लोकसंख्येचा महानगर तसेच जगातील सर्वात मोठे आर्थिक उलाढालीचे केंद्र आहे. न्यू यॉर्क व लंडनसोबत तोक्योचा जगातील सर्वात मोठे आर्थिक महासत्ताकेंद्र असा उल्लेख केला गेला आहे. २०२० सालच्या उन्हाळी ऑलिपिंक स्पर्धा तोक्यो येथे आयोजित केल्या जातील.
तोक्यो
तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!