तेलुगू टायटन्स

हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.

तेलगु टायटन्स हा विशाखापट्टणम् आणि हैदराबाद स्थित एक कबड्डी संघ आहे जो प्रो कबड्डी लीगमध्ये खेळतो. सीझन ८ मध्ये संघाचे प्रशिक्षक श्री जगदीश कुंबळे (पूर्वी बंगाल वॉरियर्सचे) आहेत. तेलुगु टायटन्स ही वाया ग्रुपचे श्रीनिवास श्रीरामनेनी, एनईडी ग्रुपचे श्री गौतम रेड्डी नेदुरमल्ली आणि ग्रीनको ग्रुपचे श्री महेश कोल्ली यांच्या मालकीच्या वीरा स्पोर्ट्सची फ्रंचायजी आहे.

टायटन्स त्यांचे घरचे सामने विशाखापट्टणम् येथे राजीव गांधी इनडोअर स्टेडियमवर तर हैदराबाद मध्ये जी. एम्. सी. बालयोगी इनडोअर स्टेडियम येथे खेळतात. टायटन्सने प्रो कबड्डी लीग सीझन २ आणि सीझन ४च्या प्लेऑफमध्ये प्रवेश केला. सीझन २ मध्ये तेलुगु टायटन्स सेमीफायनल पर्यंत पहोचले परंतु त्यांना बंगळूर बुल्सकडून ३८-३९ असा पराभव पत्करावा लागला.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →