तुकाराम ओंबळे (? - २६ नोव्हेंबर, इ.स. २००८:मुंबई, भारत) हे भारतीय सेनेतील निवृत्त सैनिक होते. निवृत्तीनंतर ते मुंबईच्या पोलीस खात्यात साहाय्यक पोलीस उपनिरीक्षक म्हणून दाखल झाले. त्यांचा २००८ मध्ये झालेल्या मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यादरम्यान मृत्यू झाला. २६ जानेवारी २००९ रोजी तुकाराम ओंबळे यांना अशोक चक्र हा मानाचा पुरस्कार देण्यात आला.२००८ च्या दहशतवादी हल्ल्यात एकमेव जिवंत दहशतवादी अजमल कसाब याला पकडण्याचे श्रेय तुकाराम ओंबळे यांना जाते.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →तुकाराम ओंबाळे
एका नवीन दृष्टिकोनातून पहा.