तारा रंगस्वामी (जन्म: २५ मे, १९५३) या भारतातील एक मानसोपचारतज्ज्ञ आहेत. त्या चेन्नई, भारत येथे असलेल्या स्कार्फ (SCARF - 'सिझोफ्रेनिया रिसर्च फाउंडेशन') या स्वयंसेवी संस्थेच्या सह-संस्थापिका आहेत. त्या छिन्नमनस्कता (सिझोफ्रेनिया) आणि सामुदायिक मानसिक आरोग्य क्षेत्रातील संशोधक आहेत. २०२० मध्ये, त्यांना इटलीतील फिरेंझे येथे सिझोफ्रेनियावरील कामासाठी असलेली सर्वोच्च संस्था 'सिझोफ्रेनिया इंटरनॅशनल रिसर्च सोसायटी' द्वारे 'SIRS आउटस्टँडिंग क्लिनिकल अँड कम्युनिटी रिसर्च अवॉर्ड' देऊन सन्मानित करण्यात आले.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →तारा रंगस्वामी
याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?