तळा तालुका हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील रायगड जिल्ह्याचा एक तालुका आहे.तळा तालुका हा रायगड जिल्ह्यातील नवीन तालुका आहे. हा भाग डोंगराळ असून येथे पुरातन कुडे लेणी आहेत,पन्हेळी येथील गायमुख हे तीर्थक्षेत्र व महाराष्ट्र राज्य पर्यटन ठिकाण आहे. जिथे गायीच्या मुखातून वर्षभर थंड पाणी येत असतो. तसेच तळगड किंवा तळागड नावाचा किल्ला आहे. येथे सन १८२६ मधे बांधलेले रामेश्वर हे शिव मंदिर आहे. तसे हे थंड हवेचे ठिकाण आहे आणि पर्यटन स्थळ आहे. तळे शहराच्या शेजारी १२ वाडया असून ६४ खेडेगाव आहेत.
तळा हे जिल्हा मुख्यालय अलिबागच्या दक्षिणेला ५८ किमीच्या अंतरावर व मुंबईपासून १३५ किमी अंतरावर आहे. तसेच मुंबई-गोवा महामार्गावरील इंदापूरपासून सुमारे १५ किमी अंतरावर,माणगाव पासून २४ किमी व रोहा पासून २२ किमी अंतरावर आहे.
तळा तालुक्याची चतुःसीमा याप्रमाणे -
पूर्वेस माणगाव तालुका, उत्तरेस रोहा तालुका, दक्षिणेस म्हसळा तालुका व पश्चिमेस मुरुड तालुका.
तळा तालुका
थोडक्यात पण महत्त्वाचे.