तमिळनाडूचा मुख्यमंत्री हा भारताच्या तमिळनाडू राज्याचा सरकारप्रमुख आहे. भारतीय संविधानानुसार राज्यप्रमुख जरी राज्यपाल असला तरी राज्याची सर्व सुत्रे व निर्णयक्षमता मुख्यमंत्र्याच्या व त्याच्या मंत्रीमंडळाच्या हातात असते. तमिळनाडू विधानसभा निवडणुकीमध्ये सर्वाधिक जागा मिळवणाऱ्या राजकीय पक्षाला राज्यपाल सरकारस्थापनेसाठी आमंत्रित करतो. त्या पक्षाच्या विधिमंडळ समितीद्वारे मुख्यमंत्र्याची निवड केली जाते. बहुमत सिद्ध करून मुख्यमंत्री आपल्या पदावर पाच वर्षे राहू शकतो.
भारताच्या स्वातंत्र्यापूर्वी मद्रास प्रांताच्या अखत्यारीखालील भूभाग २६ जानेवारी १९५० रोजी मद्रास राज्यामध्ये सामील केला गेला. १९५३ साली मद्रासमधून आंध्र राज्य तर १९५६ मध्ये केरळ व म्हैसूरचे राज्य वेगळे काढले गेले. १९६९ साली मद्रास राज्याचे नाव बदलून तमिळनाडू ठेवले गेले.
तमिळगा वेट्री कळघम पक्षाचे चंद्रशेखरन जोसेफ 'थलापति' विजय हे १० मे २०२६ पासून विद्यमान मुख्यमंत्री आहेत.
तमिळनाडूचे मुख्यमंत्री
याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?